Saturday, July 13, 2024
No menu items!
spot_img
Homeउत्तर भारत राज्यकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठाणे जिल्ह्यातील ‘ऑफलाईन’ शाळा, महाविद्यालये ३१ जानेवारीपर्यंत बंद

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठाणे जिल्ह्यातील ‘ऑफलाईन’ शाळा, महाविद्यालये ३१ जानेवारीपर्यंत बंद

राज्याच करोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन व प्रशासनाकडून सर्वोतोपरीत दक्षता घेतली जात आहे. काही दिवसांअगोदरपर्यंत करोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने राज्यातील शाळा, महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती. मात्र, आता पुन्हा एकदा संसर्ग वाढू लागल्याने विविध जिह्यांमधील जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये ३१ डिसेंबरपर्यंत तरी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. मुंबई, नवी मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यासाठी देखील असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकीर राजेश नार्वेकर यांनी याबाबत आज माहिती दिली.

ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी तसेच इयत्ता अकरावीचे ऑफलाईन वर्ग उद्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत बंद असतील. हे वर्ग पूर्वीप्रमाणे ऑनलाईन होतील. तर, इयत्ता दहवी व बारीवीचे मात्र ऑफलाईन वर्ग सुरू राहतील. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्याती दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. ठाण महापालिकेचे आयुक्त विपीन व्यास यांना देखील करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

शाळा, महाविद्यालयांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, “कोविडची संभाव्य तिसरी लाट जी होती लाट आता प्रत्यक्ष आल्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मागील आठवड्यापर्यंत ठाणे जिल्ह्याची करोनाबाधितांची जी १०० च्या आसपास आकडेवारी होती, ती आता दररोज जवळपास दोन हजारांपर्यंत वाढली आहे. करोना संसर्ग हा सगळीकडे झपाट्याने वाढू लागला आहे. ही नियंत्रित करण्यासाठी शासन आणि जिल्हाप्रशासन प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्व रूग्णालये ऑक्सिजन, बेडची व्यवस्था याबाबत पुन्हा एकदा काटेकोर नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यावर एक खबरदारीचा उपाय आणि थोडी सावधानता बाळगावी म्हणून, उद्यापासून ठाणे जिल्ह्याीतल सर्व महापालिका क्षेत्रातील, नगरपालिका क्षेत्रातीवल आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावी या सर्व माध्यमांच्या सर्व ऑफलाईन शाळा बंद असतील. पूर्वीप्रमाणे या वर्गाच्या ऑनलाईन शाळा सुरू राहतील. Latest India News ने साइटवर या बातमीबद्दल लिहिले. केवळ दहावी आणि बारावी यांचे ऑफलाईन वर्ग सुरू राहतील. हे ४ जानेवारीपासून ते ३१ जानेवारीपर्यंतसाठी हा निर्णय जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेला आहे. याच्या अंमलबजावणीस उद्यापासून सुरूवात होईल. ”

तसेच, “१५ ते १८ वयोगटामधील जे विद्यार्थी आहेत. ते जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण घेऊ शकतील. त्यांनी तातडीने आपले लसीकरण करून घ्यावे. ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना आवाहन केले जात आहे. संभाव्या तिसऱ्या लाटेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव प्रभावी अस्त्र आपल्या हाती आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अजुनही लसीकरणाला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावं. तोच एक सुरक्षा कवच आपल्याकडे आहे, याचं आपण भान ठेवावं आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावं. ” असं आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments