नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुखपदी श्रीमती विजयाताई काचावार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दि. ८ जानेवारी, २०२२ रोजी सिडको नांदेड येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनाथांची आई ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने संघांचे राज्य उपाध्यक्ष शेख मौला शेख उस्मान व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून शेख मौला शेख उस्मान यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष कामाजी अटकोरे, सरचिटणीस हर्जिंदर सिंघ संधू, सहसचिव गंगाधर सुर्यवंशी, अर्धापूर तालुकाध्यक्ष अनिलकुमार थोरात, नांदेड शहर अध्यक्ष शिवराज कांबळे, श्रावण गायकवाड, नितीन नंदकिशोर पाटील, सुरेश फुलारी मुदखेडकर, दिनेश ठाकूर, नितेश पाटील, विक्रम खांडेकर, शिवाजी शिंदे हळदेकर, देविदास तुकाराम कदम, वैजनाथ माने, नंदाताई गुर्जलवाड, पाटील मॅडम, वट्टमवार मॅडम आदी महिला व विजयाताई काचावार यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्त्यानी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार अनिलकुमार थोरात यांनी केले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेडच्या वतीने समाजसेविका श्रीमती विजयाताई काचावार यांचा नागरी सत्कार
RELATED ARTICLES