प्रतिनिधी :- शिवाजी कराळे
हिंगोली येथे कार्तिक महोत्सव सेवा समिती द्वारा आयोजितश्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 751 व्या जयंतीनिमित्त रामलिला मैदान येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन महोत्सवाची सांगता दिनांक 5 जानेवारी बुधवार रोजी श्री 108 स्वामी लोकेश चैतन्य स्वामी महाराज पंढरपूर यांचे सकाळी 11 ते 1 वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 751 व्या जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.