Wednesday, December 11, 2024
No menu items!
spot_img
Homeउत्तर भारत राज्यजांभरून आंध तांडा येथील नवोपक्रमशील शिक्षक राजकुमार मोरगे सर यांचा " गुरुदक्षिणा...

जांभरून आंध तांडा येथील नवोपक्रमशील शिक्षक राजकुमार मोरगे सर यांचा ” गुरुदक्षिणा ” हा लघुचित्रपट मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम यांच्या शुभहस्ते रिलीज करण्यात आला

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जांभरून आंध तांडा येथील नवोपक्रमशील शिक्षक राजकुमार मोरगे सर यांचा ” गुरुदक्षिणा ” हा लघुचित्रपट मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम यांच्या शुभहस्ते रिलीज करण्यात आला. सोबतच या चित्रपटाचे अतिशय आशयपूर्ण पोस्टर यावेळी लॉंच करण्यात आले. ज्ञानदानाचे अविरत कार्य करणारे मोरगे सर हे बहुगुणी व्यक्तिमत्व असणारे आहेत.

राज्य व देश पातळीवरील विविध मासिक , दिवाळी अंक यांच्यात लेख , कविता , कथा लेखन करत असतानाच यु.एस. ए. ( अमेरिका ) व ऑस्ट्रेलिया* या देशातून प्रकाशित होणाऱ्या ” हम हिंदुस्थानी ” हिंदी सप्ताहिकातून त्यांनी लेखन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले साहित्य पोचविले आहे. एक आदर्श शिक्षकाबरोबरच उत्तम लेखक, कवी, गीतकार, कलाकार व निर्माता अशा सर्व भूमिका साकारत यशाला गवसणी घालण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम सोबतच , आमदार टारफे साहेब, जि प सदस्य संजयजी दराडे , वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथजी कुटे, , साम tv पत्रकार संदीप नागरे व इतर मित्रमंडळ यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments