कसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, लोणावळ्याच्या दिशेला जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प…

22/07/2021

मुंबईसह राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याकडे […]

Read More

Coronavirus : राज्यात दिवसभरात ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित, १६५ रूग्णांचा मृत्यू

22/07/2021

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. काल करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही करोनाबाधितांपेक्षा जास्त होती. तर, आज पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या […]

Read More

कोल्हापूरला महापुराचा धोका; एनडीआरएफच्या पथकांना पाचारण

22/07/2021

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी इशारा पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात येत आहेत. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. कोल्हापूर […]

Read More

रायगड: महाडमधील पूरस्थिती गंभीर, धोक्‍याचा इशारा; अनेक गावांचा संपर्क तुटला

22/07/2021

अलिबागमध्ये बुधवारी संध्‍याकाळपासून कोसळत असलेल्‍या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडच्‍या सुकट गल्‍ली, भोईघाट परीसरात साडेतीन फूटांपर्यंत पाणी आहे. तर बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. दस्‍तुरीनाका, क्रांतीस्तंभ, शिवाजी महाराज चौक परिसरदेखील जलमय झाला आहे. शहराजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच महाबळेश्‍वर येथे होत असलेल्‍या मुसळधार […]

Read More

चिपळूणवर आभाळ फाटलं! अतिवृष्टीने भीषण स्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती

22/07/2021

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने मुक्काम ठोकला असून, गेल्या २४ तासांत पावसाने कोकणात रौद्ररुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं […]

Read More

corona update : देशात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण, ५०७ रुग्णांचा मृत्यू

22/07/2021

देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. रोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज करोनाबाधितांची संख्या करोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. महाराष्ट्र सरकारने करोना आकडेवारीत दुरुस्ती केल्याने काल देशभरात गेल्या २४ तासांत ३९९८ […]

Read More

यूजीसीच्या शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडर जाहीर:महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये 1 ऑगस्टपासून सुरु होणार प्रवेश प्रक्रिया, तर 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार नवीन सत्र

17/07/2021

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 2021-22 च्या सत्रासाठी अॅकेडमिक कॅलेंडर आणि परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सर्व महाविद्यालयांना 31 ऑगस्ट 2021 पूर्वी अंतिम वर्ष आणि सेमिस्टर परीक्षा पुर्ण कराव्या लागणार आहे. यूजीसीने नवीन प्रवेशासंदर्भांत सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांना तसे निर्देश दिले आहेत. मार्गदर्शक सुचनांनुसार, 2021 मध्ये पदवीधर प्रवेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. […]

Read More

अकरावीच्या सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी

17/07/2021

राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून, १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश […]

Read More

‘सर्व उत्तीर्ण अभियाना’तही ७५८ विद्यार्थी नापास

17/07/2021

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तयार के लेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के  लागला असून, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे सारेच उत्तीर्ण होण्याची शक्यता असतानाही ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४८ विद्यार्थी शाळा, शिक्षकांच्या संपर्कातच नसल्याने त्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाले नाही. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक १०० टक्के , […]

Read More

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट, तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!

17/07/2021

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून […]

Read More
Translate »