
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 23 तारखेला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आयोजित केला आहे, ओबीसी च्या न्याय व हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव कटिबद्ध आहे त्यासाठी 23 तारखेला बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षन पुन्हा लागू करावं, ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करावी व केंद्र सरकार ने इम्पिरियल डेटा राज्य शासनाला द्यावा इत्यादी मागणी साठी 23 तारखेचा मोर्चा वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित करण्यात आला आहे, सदर मोर्चास आत्तार, मणियार, तांबोळी OBC आरक्षण बचाव समिती हिंगोली तर्फे सदर आंदोलनास पत्र देऊन जाहीर पाठींबा देण्यात आला आहे, सदर पाठिंब्याचे पत्र ओबीसी जिल्हा महासचिव रवींद्र वाढे यांच्या कडे सुपर्त करण्यात आले. यावेळी सदर पत्र घेऊन ओबीसी समाजाचे हिंगोली चे नेते विनोदराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हिंगोली टीम मोर्च्यात सहभागी होण्यास रवाना झाली आहे, पाठिब्याच्या पत्रावर सत्तार तांबोळी,शेख इसा तांबोळी,शेख हनीफ तांबोळी,शेख मुशीर आत्तार,शेख अतिक मणियार आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, यावेळी हिंगोली जिल्ह्या तर्फे ओबीसी समाजाचे नेते यांच्या नेतृत्वात 23 तारखेला होणाऱ्या मोर्चास जिल्हा सचिव ज्योतीपाल रनवीर, जिल्हा उपाध्यक्ष रघुवीर हाणवते, शहर अध्यक्ष अतिकूर रेहमान, जिल्हा नेते दुल्ले खा पठाण, युवा नेते भूषण पाईकराव व कार्यकर्ते मुबंई साठी रवाना झाले