September 25, 2023

धुळे : ग्रँड मराठा फाउंडेशन ही महाराष्ट्रातील स्वयंसेवी संघटना असून त्यांच्या वतीने व कृषी विज्ञान केंद्र-धुळे, महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील चौगाव येथे शेतकऱ्यांसाठी जैविक आणि पर्यायी शेतीबाबत जनजागृती उपक्रमाचे आयोजन अलीकडेच करण्यात आले. 5 डिसेंबर 2021 रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्देश जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी आणि सुपीकता सुधारण्यासाठी सेंद्रिय आणि पर्यायी शेती पद्धतींबाबत जनजागृती करणे हा होता. यावेळी आयोजकांनी रासायनिक शेतीचे तोटे व जोखीम आणि त्याचे मातीवर होणारे दुष्परिणाम आणि शेतीच्या पद्धती बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी निधी व्यवस्थापनाचे महत्त्व यावरही भर दिला.

या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे नामांकीत वैज्ञानिक – कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश आर नांद्रे, विषय तज्ज्ञ (एसएमएस)- रोप सुरक्षा डॉ. पंकज पी. पाटील, विषय तज्ज्ञ (एसएमएस)- एएचडीएस, डॉ. धनराज मधुकर चौधरी, विषय तज्ज्ञ (एसएमएस)- एसएसएसी व डॉ. आतिश अजित पाटील हे सहभागी होते. शेतकऱ्यांना नवीनतम सरकारी धोरणे, योजना आणि सहाय्यक कंपन्यांची महत्त्वाची माहिती देऊन सक्षम करणे आणि त्यांच्या शेतमालासाठी योग्य बाजारभाव ओळखणे हा यामागचा उद्देश होता.
या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्रँड मराठा फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. माधवी शेलटकर व संस्थापक श्री रोहित शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गरीब शेतकरी कुटुंबांना पाठिंबा देण्यासाठी 15 शिलाई मशीन, 7 पशुधन शेळ्या आणि 200 जैविक खतांच्या किट दान केल्या.

या जनजागृती अभियानाविषयी बोलताना ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक आणि सिने निर्माते रोहित शेलटकर म्हणाले की, “भारत सरकारने शेतकऱ्यांसाठीचे नवीन कायदे रद्द करण्याची जी घोषणा अलीकडे केली आहे, ती स्वागतार्ह आहे. हा निर्णय झाल्याने, तातडीने हा जनजागृतीचा उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे आम्हाला लक्षात आले. ज्याचा लाभ शेतकरी समुदाय आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल. शेतकऱ्यांवर बऱ्याचदा नामुष्की ओढवते, आव्हाने उभी राहतात, त्यांच्यावर कर्ज झाल्याने अपप्रसंग घडतात. आम्ही या पार्श्वभूमीवर कृषीविज्ञान केंद्र, धुळेसोबत भागीदारी केली आणि हि भागीदारी या शेतकऱ्यांना शिक्षित आणि सक्षम करेल तसेच त्यांना त्यांच्या उत्पादनाची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती शिकण्यास मदत करेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *