हिंगोली :- पोलीस म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो, विशेषतः गुन्हेगारांना तर साहजिकच पण पोलिसांची वर्दी बघितली की लहान मुले देखील घाबरत असतात. अनेक वेळा पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रारदाराच्या सोबत असलेले लहान बालकांना भीती वाटते लहान बालकांच्या मनातील भीती पोलिसांनी दूर केली आहे.
.हिंगोली जिल्ह्यात पहिल्यादांच चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती हिंगोली पोलिसांनी केलीय. हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात या पोलिस स्टेशनचे उदघाटन मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख, हिंगोली शहर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक काचमांडे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे यांची उपस्थिती होती. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी गतवर्षी भरोसा सेल नंतर यंदा चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशन हा उपक्रम, नविन चांगली संकल्पना आणली आहे. यासाठी उपविभागीय पोलीस पोलिस अधिकारी यतिश देशमुख व हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी परिश्रम घेतले आहेत.
शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत त्यांची मुलेही येत असतात. तसेच बालका वरही अत्याचार होण्याच्या घटना होतात.
तर काही ठिकाणी लहान मुलांचा वापर करुन गुन्हे केले जातात. अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात, तेव्हा पोलिसांबद्दल त्यांच्या मनात भिती असते.तसेच, कुटुंब कलाहामुळे मुलांच्या मनावरही त्याचे विपरीत परिणाम होत असतात. अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात.तेव्हा त्याच्या मनावरील दडपण कमी करण्याकरता चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागार पोलीस यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलीय.शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हे स्टेशन सुरु करण्यात आले. या स्टेशनच्या भिंतीवर विविध कलाकृती साकारुन रंगविण्यात आल्या आहेत.तसेच, खेळणी, खुर्च्या, टेबल, पुस्तकंही ठेवण्यात आली आहेत. या स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून तेच इथे येणाऱ्या मुलांचे मनोधैर्य वाढविणार आहे. पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.