Wednesday, April 24, 2024
No menu items!
spot_img
Homeदक्षिण भारत राज्यआंध्र प्रदेशहिंगोली जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक , हेमंत पाटील यांच्यासह मुंबईला रवाना

हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक , हेमंत पाटील यांच्यासह मुंबईला रवाना

हिंगोली : लोकसभा मतदारसंघ करता महायुती तर्फे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील यांची उमेदवारी पाच दिवसापूर्वी जाहीर झाली होती.

भाजपाने त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविल्यानंतर बाबुराव कदम कोहाळीकर यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली गतिमान होताच, हेमंत पाटील यांच्यासह हजारो शिवसेना पदाधिकारी मंगळवारी मुंबईला झाले.महायुतीच्या वाटाघाटीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली. परंतु यापूर्वीच भाजपा पदाधिकाऱ्यांना त्यांनी वागणूक चांगली दिली नसल्याने त्यांच्यावर पूर्वीपासूनच संताप होता. उमेदवारी जाहीर होताच भाजपाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील यांना कदापिही मतदान केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढताच शिंदे गटातर्फे उमेदवारी बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या. ज्यामध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांचे नाव पुढे आले.भाजपाने हेमंत पाटील यांना विरोध दर्शवतात हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी देखील नांदेडमध्ये भाजपाच्या उमेदवारास मदत केली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक हेमंत पाटील यांच्यासह मुंबईला ३ एप्रिल ला शक्ती प्रदर्शन करण्याकरता रवाना झाले. हेमंत पाटील यांचीच उमेदवारी कायम राहावी, अशी मागणी पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments