हिंगोली(१८) स्वेच्छा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून दांनदात्याच्या दाना मुळे गरजू ला जीवनदान मिळते त्यामुळे रक्तदान हे जीवनदान आहे असे उदगार हिंगोली येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे प्रबंधक रमेश राठोड ह्यांनी काढले.हिंगोली येथील युनियन बँके च्या इमारतीत आयोजित रक्तदान शिबिराचे स्वागतपर प्रास्ताविक करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दलितमित्र डॉ.विजय निलावार तर उद्घाटक म्हणून उद्योगपती ज्ञानेश्वर मामडे उपस्थित होते.हयाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष व ब्यांकेचे कायदेशीर सल्लागार ऍड आर.एन. अग्रवाल,ऍड अभिजय चव्हान ,बँक ऑफ इंडिया चे प्रबंधक आशिष अवचार,डॉ.श्रद्धा कडू आदी उपस्थित होते.ह्या सर्वांच स्वागत ब्यांकेचे सर्वश्री स्नेहजित कळसकर,भागवत लोथे,संदीप गायकवाड,ओमकार कल्याणकर,स्वाती बोथीकर,सुनील काळे ह्यांनी केले.अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी १०६ व्या वर्षात पदार्पण केलेल्या युनियन ब्यांक ऑफ इंडिया ने ग्राहक कल्याण साधत राष्ट्रीय व सामजिक बांधिलकी जपून उपक्रम राबवले असून हिंगोली शाखेने रक्तदान शिबिर आयोजित करून त्यात मानाचा तुरा खोवला आहे असे सांगून प्रबंधक रमेश राठोड व ह्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार केला.शिबिराच्या यशस्वीते साठी हिंगोली जिल्हा शासकीय रक्तपेढी च्या जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.स्वाती निलेश गुंडेवार,वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रद्धा कडू ,रक्त पेढीचे सर्वश्री संतोष सोनटक्के,सचिन ठाकरे,सतीश तडस,नितीन हांडगे,पत्रकार राजू गवळी,पत्रकार बाळू जाधव, सौरव ओंकार,नारायण मगर, ब्यांकेतील सर्व स्टाफ आदींनी विशेष परिश्रम घेतले.ऐन कडक उन्हाळ्यातही एकूण ३० रक्तदात्यानी ह्या शिबिरात रक्तदान केलयाने त्यांच्या बद्दल अमरावती विभागाचे प्रमुख प्रमोद चऱ्हाटे,हिंगोली चे प्रबंधक रमेश राठोड व उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
स्वेच्छा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान– प्रबंधक रमेश राठोड
RELATED ARTICLES