हिंगोली : सामाजिक न्याय विभाग बार्टी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात संत रोहिदास यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवतेची शिकवण देणारे संत रविदास यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन अभिवादन करण्यात आले . यावेळी प्रमुख उपस्थितीत समाजकल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे , बार्टी चे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे , बार्टी समतादूत अशोक इंगोले , सुरेश पठाडे , संदीप घंतोडे , दिपक कांबळे , शेषराव जाधव , प्रफूल पटेबहादूर , राहुल भराडे , कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नरवाडे , अॅड . विनोद ठाकरे , गजानन कोरडे रितेश बगाटे , रवी कोळी , सुनील वडकुते , अहिरेकर , शेषराव पिंपरे , राहुल जाधव , शुभम यादव , माधव भुयर आदी उपस्थित होते .
Post Views:
122