News Express24

site logo
Breaking News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

 

जळगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने जळगाव जिल्हाध्यक्ष सतिश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा सल्लागारपदी ॲड. अशोक शिंदे
जिल्हा संपर्क प्रमुखपदी धम्मरत्न गणवीर, जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान पाटील, जळगाव तालुका अध्यक्षपदी विशाल सुरवाडे, धरणगाव ग्रामीण अध्यक्षपदी मुझमील शेख, नारायण चव्हाण निलेश जवरे, राजेंद्र गणवीर, मयूर वाघूलदे, रवींद्र दाभाडे, आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पत्रकारिता कशी असावी व समाज प्रभोधनासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल? याबद्दल अध्यक्षीय भाषणात ऍड अशोक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नंतर संघटनेविषयी मार्गदर्शन व येणाऱ्या काळात संघटना कशी बळकट करता येईल याविषयी जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख धम्मरत्न गणवीर यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे संथापक अध्यक्ष मा. डी.टी. आंबेगावे यांनी vdo कॉलिंग करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी जिल्हाध्यक्ष सतिश सोनवणे यांनी सर्व पत्रकांना संघटना बळकट कशी करता येईल, त्यासाठी टीमवर्क कसं करावं यासंदर्भात मार्गदर्शन करून संघटनेच्या नियमावलीत राहून कार्य करण्याचे आवाहन केले. कुठल्याही पत्रकारावर अन्याय होत असेल तर त्याला संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा आश्वासनही यावेळी देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष समाधान पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डी. टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना मा जळगांव जिल्हा अध्यक्ष सतीश सोनवणे व ऍड शिंदे साहेब, धम्मरत्न गणवीर व समाधान पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
सदर कार्यक्रमाचे पद्मालय शासकीय विश्ररामगृह जळगाव येथे कोरोना नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सांगता अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. व सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist