News Express24

site logo
Breaking News

श्रद्धाचे फिटनेस गोल्स तुम्हालाही देतील प्रेरणा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

10 डिसेंबर, 2021: श्रद्धा कपूर ही बॉलिवुडमधली एक लोकप्रिय अभिनेत्री. वैविध्यपूर्ण भूमिका आणि लक्षवेधी फॅशन सेन्समुळे ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत सक्रीय असते.
5 सेकंदांच्या या व्हीडिओत श्रद्धा ट्रेडमिलवर वेगात चालताना दिसते आहे. फिटनेसबाबत श्रद्धा सतत जागरूक असते. शुटिंगच्या व्यस्त शेड्युलमधूनही ती नियमित वर्कआऊटसाठी वेळ काढते.
नुकत्याच आलेल्या व्हीडिओत ती रात्रीच्या शुटिंग शेड्युलआधी वेळ काढून वर्क आऊट करताना दिसते आहे. रात्री शुटिंगला जाण्याआधी वर्कआऊट गोल्स पूर्ण करण्यासाठी ती कार्डिओ करते आहे.
#WorkoutWednesday #Koooftheday #Koo #KooKiyaKya #KooIndia असे हॅशटॅगही श्रद्धाने दिले आहेत. तिने वर्कआऊटसाठी पांढरी हुडी, पांढरी शॉर्ट्स आणि पांढरे शुज घातले आहेत. स्पोर्टी लुकला अजून उठाव देण्यासाठी तिने केस वर पोनीटेलमध्ये बांधले आहेत.
बॉलिवुडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. आता कॅटरिना आणि विक्कीच्या लग्नानंतर श्रद्धाच्याही लग्नाच्या चर्चा बॉलिवुडमध्ये सुरू आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ याला श्रद्धा कपूर डेट करते आहे.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist