डॉ तात्यारावजी लहाने साहेब…जगप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ….जवळपास 1लाख 62 हजाराच्या ही वर नेत्र शस्त्रक्रिया करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नाव नोंदवणारे…डॉ बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे मोफत गोरगरीब आदिवासी समाजातील लोकांच्या नेत्र शस्त्रक्रिया करणारे….त्यांच्या या समाज सेवेची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला…. मुंबईतील ग्रँट कॉलेज आणि जे जे रुग्णालयाचे डीन असणारे….. डॉ बाबा आमटे यांच्या श्रम संस्कार छावणीमध्ये तरुणांना दरवर्षी मार्गदर्शन करून समाजसेवेची ओढ लावणारं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व… विशेष म्हणजे सोमनाथ प्रकल्पात जेवण केल्यानंतर स्वतःचं ताट डॉ. तात्यारावजी लहाने हे स्वतःच स्वच्छ धुवून घेतात…. अशा या 24 तास जनसेवेचे व्रत घेतलेल्या महासागराची… आज हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी मुंबई येथे भेट घेतली
आज पर्यंत आमदार संतोष बांगर साहेब यांनी केलेल्या जनसेवेच्या तसेच कोरोना काळात स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून गोरगरीब रुग्णांसाठी रेमडीसीवर विकत घेऊन गरजू रुग्णांना मोफत वाटणारा एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून डॉ तात्याराव लहाने यांना बातम्या द्वारे व सोशल मीडिया द्वारे आमदार बांगर यांच्याबद्दल माहिती होती….नंतर अनेकवेळा या दोन्ही जनसेवेचे व्रत हाती घेतलेल्या जन सेवकांची दूरध्वनीद्वारे चर्चा होत असे… हिंगोली जिल्ह्यातून आमदार संतोष बांगर साहेब यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठविलेल्या पेशंटची डॉ. तात्याराव लहाने हे आपुलकीने विचारपूस करून त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत करीत असत… पण या दोन्ही लोकसेवकांची प्रत्यक्ष भेट मात्र काही झालेली नव्हती…. परंतु आज आमदार संतोष बांगर साहेब यांनी मुंबई येथे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत लोकसेवेचे व्रत हाती घेतलेल्या या महासागराची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली…. यावेळी सच्चे समाजसेवक असलेल्या डॉ. लहाने यांनी आमदार संतोष बांगर यांची कडाडून गळाभेट घेत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं…. डॉक्टर लहाने म्हणाले की…. “संतोष तुझ्या सारख्या तरुणांची या महाराष्ट्राला खूप गरज आहे…. तु ज्या पद्धतीने लोकांची सेवा करतोस…. स्वतःच्या जीवाची.. पैशाची… पर्वा न करता… लोकांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून देतोस …ती गोष्ट इतर लोकप्रतिनिधी मध्ये फार क्वचित आढळते…. संतोष मला तुझ्यासारख्या लोकप्रतिनिधींचा अभिमान आहे… तू तुझं कार्य असचं सुरु ठेव… तुला कुठेही माझी गरज लागली… तुला कुठेही माझी आवश्यकता भासली… तर बिनधास्त तू मला आवाज दे… मी तुझ्या मदतीसाठी नेहमी हजर राहिल…. कारण जे कार्य तू गोरगरिबांसाठी करतोस… ते कार्य प्रत्येक लोकप्रतिनिधीना जमतेच असे नाही… कारण एकदा का नेता निवडून आला की तो सामान्य लोकांना विसरतो हा आज वरचा अनुभव आहे…. परंतु संतोष मला तुझ्या रूपात एक सच्चा समाजसेवक दिसतो… तुला सामान्य जनतेचा भरभरून आशीर्वाद नेहमी भेटत राहील ..अशा शब्दात लोकसेवेचे व्रत घेतलेल्या महासागराने …. हिंगोली जिल्ह्यातील गोरगरिबांची 24 तास… स्वतःच्या जीवाची पर्वा न करता… स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून… अहोरात्र सेवा करणाऱ्या जनसेवकाची कडाडून गळाभेट घेतली…. आणि आमदार संतोष बांगर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.. यावेळी उपस्थित असलेले युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम व इतर मान्यवर देखील डॉ. तात्याराव लहाने यांच्या भेटीने व कौतुकाने भारावून गेले… पद्मश्री भेटलेल्या… दीड लाखाच्यावर नेत्ररोग शस्त्रक्रिया करणाऱ्या…आमटे कुटुंबियांसमवेत लोकसेवा करणाऱ्या… जगद्विख्यात लोक सेवकाने… हिंगोली जिल्ह्यातील जनसेवेचे व्रत हाती घेतलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने… आमदार बांगर यांनी आजपर्यंत केलेल्या लोकसेवेचे खऱ्या अर्थाने मला बक्षीस भेटले…अशा शब्दात आमदार बांगर यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या..