6 डिसेंबर, 2021: भारताने न्युझीलॅंडविरूद्ध सामना जिंकल्यावर देशभरात क्रिकेटप्रेमी एकच जल्लोष करत आहेत. समाजमाध्यमांवरही लोक विविध पोस्ट्स करून आनंद व्यक्त करत आहेत. भारताने न्युझीलॅंडविरूद्ध दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट मॅचमध्ये 372 धावा काढत एकहाती विजय मिळवला.
ही टेस्टमध्ये रनांच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय आणि किवी टीमची सर्वात मोठी हार आहे. न्युझीलॅंडची टीम कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये हारण्याची नामुश्की कशीबशी टाळली. मात्र आज मुंबईतल्या मॅचमध्ये भारताने न्युझीलॅंडला पाणी पाजले. विशेष म्हणजे न्युझीलॅंडने 1988 पासून भारतात कुठलीच टेस्ट मॅच जिंकलेली नाही.
कानपूर टेस्टमध्ये आज मयंक अग्रवालने धुंवाधार बॅटिंग करत ‘मॅन ऑफ द मॅच’चा खिताब मिळवला. त्याने एकुण 212 धावा काढल्या. आजच्या टेस्टमध्ये भारताने 372 धावा काढत रेकॉर्ड केला. हा भारताच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात हा सर्वात मोठा विजय आहे.
‘कू’वर असलेल्या दिग्गज क्रिकेटपटु, क्रिकेट समीक्षक आणि सामान्यांनी पोस्ट लिहित आनंद व्यक्त केला आहे.
लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली याने ‘कू’वर सामन्यादरम्यानची विविध क्षणचित्रे पोस्ट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.