_________________________
हिंगोली : प्रतिनिधी दि.20/12/2021
कर्मयोगी संत गाडगेबाबाचा संसार त्याग म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धानी केलेल्या त्यागाच्या इतिहासाची पुनःरावृत्ती होय, म्हणून प्रत्येकाने त्यागी संतांचा संघर्षमय इतिहास जाणून घेतला पाहिजे. असल्याचे मत संत गाडगेबाबा स्मृतिदिनी समाजकल्याण सहायक आयुक्त मिनगिरे यांनी अभिवादन पर बोलतांना व्यक्त केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समतादूत हिंगोली च्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या परिनिर्वाण, पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला .
बार्टी जिल्हा कार्यालयात दिनांक : 20 डिसेंबर सोमवार रोजी 11:00 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून सर्वांनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे,बार्टी चे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे हे उपस्थित होते. बार्टीचे समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफूल पटेबहादूर, दिपक कांबळे, संदीप घनतोडे, ऍड,व्ही. के. ठाकरे, गजानन कोरडे, सखाराम चव्हाण,रितेश बगाटे, रवी कोळी आदी उपस्थित होते.