News Express24

site logo
Breaking News

बंधाऱ्याला निधी मिळाला कोटी कोटी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

प्रतिनिधी :- शिवाजी  कऱ्हाळे

हिंगोली जिल्ह्यांमध्ये सन 2020 ते 2021 या कालावधीमध्ये जलसंधारण विभाग यांच्या वतीने जे काही बंधारे बांधण्यात आले आहेत. ते शासनाच्या निकषानुसार बांधले आहेत का याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. कारण याविषयी सविस्तर माहिती अशी की हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराळे येथे जलसंधारण विभागाच्या वतीने दोन बंधारे झाले आहेत. पण हे बंधारे योग्य झाले आहेत का याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. कारण दिग्रस कराळे येथील शेख मदार यांच्या शेतात बांधण्यात आलेल्या बंधारा मधून चक्क सिमेंट काँक्रेट केलेल्या भिंती मधूनच पाण्याच्या धारा लागल्या आहेत. अशी बोगस बांधा रे बांधणाऱ्या क्वालिटी कंट्रोल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे.तसेच या बंधाऱ्यावर नेमिले इंजिनियर यांनीसुद्धा जाणून बुजून दिग्रस येथील बंधारा कडे दुर्लक्ष करून ठेकेदारांना वाचवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

दिग्रस कराळे येथील बंधाऱ्यांचे काम झाले रात्री चांगले होईल का याची आहे का खात्री. अशी बातमी प्रकाशित करून सुद्धा क्वालिटी कंट्रोल तसेच या बंधाऱ्यावर नेमलेले इंजिनियर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून. बंधारे बांधणार या ठेकेदारांना पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या रकमेची बंधारे बांधून सुद्धा जर या बंधाऱ्याच्या भिंती मधून पाणी गळत असेल. तर याचा दोष कुणाचा आहे हे शेतकरी वर्ग कळवले महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी अशा बोगस झालेल्या बंधारा विषयी बोलताना म्हणत आहेत की. बंधारे बांधण्यासाठी निधी मिळाला कोटी कोटी..

पण बंधारे सिमेंट काँक्रीटच्या भिंती मधूनच गळू लागले ने केलेली मलमपट्टी..शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जर शासनाकडून निधी मिळत असेल आणि त्या निधीचा योग्य वापर होत नसेल. तर बोगस काढून करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे अशी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

 

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist