News Express24

site logo
Breaking News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

 

 

 

 

उमरखेड : राज्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या एकमेव अशा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरखेड कार्यकारणीची बैठक काल उमरखेड येथे विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीमध्ये तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी की कार्यकारणी घोषित केली. यात मुळावा येथील पुण्यनगरीचे पत्रकार हरिदास इंगोलकर यांची सर्वानुमते उमरखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून संदेश कांबळे,संदीप पेंटेवाड तर सचिवपदी गजानन वानखेडे यांची निवड घोषित करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ही राज्यातील पत्रकारांसाठी नेहमी झटत राहणारी संघटना आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे नेहमीच पत्रकारांच्या मागे ठाम पणे उभे असतात व त्यांच्या हक्कांसाठी लढतात. या बैठकीला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, महिलाध्यक्षा अर्चना भोपळे, जिल्हा पदाधिकारी उदय पुंडे, गजानन गंजेवाड, विवेक जळके, सुनील ठाकरे, मोहन कळमकर, मारुती गव्हाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist