News Express24

site logo
Breaking News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची लोहा व अर्धापूर तालुका कार्यकारिणी जाहीर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

 

 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मा.संस्थापक अध्यक्ष श्री. डी. टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री. संजीवकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह लोहा येथे बैठक पार पडली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुका अध्यक्षपदी शिवराज पाटील पवार तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड दि.१५.१२.२०२१ रोजी शासकीय विश्रामगृह लोहा येथे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे, नांदेड जिल्हा व शहर अध्यक्ष इंजि.सिंघसाब सिंधू आदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. नुतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. राज्यातील पत्रकारांवर होत असलेले हल्ले पत्रकारांच्या कौटुंबिक सुखदुःखात तसेच पत्रकारांच्या अडीअडचणीसाठी व पत्रकारांना पत्रकार भवन आणि शासनाकडून शासकीय जागेत निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी व अन्य प्रश्नांसाठी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली सदैव लढा देत असल्याचे सांगितले.

लोहा तालुका कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे बापू गायकर, उपाध्यक्षपदी दैनिक सत्यप्रभाचे संजय कहाळेकर, सरचिटणीसपदी देवगिरी वृत्तपत्राचे प्रदीप कुमार कांबळे, सचिवपदी दैनिक विष्णुपुरी एक्सप्रेसचे प्रा.मारोती चव्हाण, सहसचिवपदी दैनिक श्रमिक लोकराज्यचे तुकाराम दाढेल, कोषाध्यक्षपदी दैनिक नांदेड चौफेरचे रमेश पवार, सह कोषाध्यक्षपदी दैनिक सामनाचे संतोष तोंडारे, प्रसिद्धी प्रमुखपदी दैनिक साहित्य सम्राटचे शिवराज दाढेल व दैनिक देशोन्नती शहर प्रतिनिधी अशोक सोनकांबळे, सदस्य पदी शैलेश ढेंबरे अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव सोनकांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन बा.पु.गायकर व आभार प्रदर्शन तुकाराम दाढेल यांनी मानले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अर्धापूर तालुकाध्यक्ष पदी श्री. अनिलकुमार थोरात यांची निवड करण्यात आली असून यावेळी नांदेड जिल्हा कार्यकारणीतील गोविंद तोरणे, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे,माधव अटकोरे, नांदेड शहर उपाध्यक्ष शिवराज कांबळे, देसाईसर जिल्हा इजी.हर्जिंदर सिंग संधू, सूर्यतळे सर आदी उपस्तिथ होते.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist