News Express24

site logo
Breaking News

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाची हदगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

 

 

हदगाव : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची हदगाव तालुका नव्याने कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. हदगाव तालुक्याचे गतवर्षी संघटनेचे अध्यक्ष संदीप तुपकरी यांना पदोन्नती देऊन नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी बढती करण्यात आली आहे. हदगाव तालुका अध्यक्षपदी कैलास तलवारे यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी संतोष डवरे, सचीव पदावर सिध्दार्थ वाठोरे, तर सहसचीव पदावर भगवान शेळके, आणि कोषाध्यक्ष म्हणून संजय तोष्णीवाल, यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून चंद्रकांत भोरे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषार कांबळे, केदार प्रसाद गोवर्धन दायमा, सल्लागार भगवान कदम सह अनेक महिला पत्रकार यांच्यासह अनेक विविध पदांची अजुनही निवड करण्यात येणार असल्याची चर्चा केली. निवड प्रक्रियेसाठी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, निरीक्षक म्हणून यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ राठोड, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष् राजेश मामीडवार, तर जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डवरे यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना अनिल राठोड म्हणाले की, पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ केले जाणार नाही. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सभासद असलेल्या पत्रकारांनी घाबरायचे कारण नाही संघटना वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवा आपल्या पेनचा योग्य वापर करून गोरगरिबांच्या भल्यासाठी निर्भीड बातम्या लिहा. कोणालाही न घाबरता लिखाण करत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे नमूद करून महिलांसाठी जिल्हा कार्यकारणीसाठी असलेले पद रिक्त असल्याने उपस्थित महिला रूपा देवी पाटील, पुजा राउत, सुभदरा डोंगरदिवे, यांना त्या ठिकाणी विराजमान करण्याचेही त्यांनी वरिष्ठाकडे बोलणे चालू असल्याचे सांगितले यावेळी संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या मोबाईल नंबरवर कोणतीही अडचण असल्यास सरळ फोन करून माहिती विचारण्याचे सांगितले आहे. सदरील पत्रकार संघटनेची निवड हादगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच संपन्न झाली असून दिलेल्या संधीचे सोने करेल असे निवड प्रक्रियेत पदभार स्वीकारलेल्या मान्यवरांनी उपस्थितांना ग्वाही दिली दर महिन्याला संघटनेच्या माध्यमातून गाव पातळीवर मिटिंग घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही पत्रकार बांधवांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना सांगितले.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist