हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचाराला वेगाला असून दिं 21 एप्रिल रोजी सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार दरम्यान सभेचे आयोजन विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मतदारांना संबोधित करताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की ज्यांनी ज्यांनी पक्ष फोडण्याच महापाप केलं आहे अशा गद्दारांना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे.ज्या भाजपने गेल्या पाच ते दहा वर्षात आश्वासनाची खैरात केली त्या आश्वासनाची पूर्तता अध्यापही त्यांच्याकडून झालेली नाही.म्हणून अशा या लबाड ढोंगी राजकारणांना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे.असे लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी संबोधित केलेयावेळी नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की ज्यांनी पक्ष फोडण्यासाठी त्यांच्यावर जेवढा खर्च केला तेवढा खर्च जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात केला असता तर शेतकरी समाधान झाले असते.यावेळी कार्यक्रमास हिंगोली चे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ अभिषेक बेंगाळ, वशिम देशमुख, डॉक्टर रमेश शिंदे, द्वारकादास सारडा, आयोध्या पौळ, दिनकराव देशमुख, मनीषा आखरे, बबन गाडे, गणेश शिंदे, दाजीबा पाटील, कारेगावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाईकवाल मामा, यांच्यासह अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नागेश पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्याघोषणा दिल्या
.यावेळी नागेश पाटील म्हणाले की समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करणार होते यांनी अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक केले नाही.अशा खोटारड्यांना त्यांना त्यांची जागा दाखवा असे यावेळी अष्टीकर म्हणाले.