हिंगोली – कळमनुरी येथील गुजरी बाजार , वाकोडी सर्कल खरवड सर्कल व कळमनुरी शहर या ठिकाणी हिंगोली लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा सोमवारी घेण्यात आली.यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन .महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केला .
यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, मा.आमदार डॉ.संतोष टारफे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव जक्की भैया कुरेशी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम भाई देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे, शंकर सवंडकर, सोपान पाटील, अब्दुल्ला पठाण, चंद्रकांत देशमुख, सखारामजी उबाळे , मारोतराव खांडेकर, नागोराव करंडे, मधुकर कुरुडे, प्रा.कृष्णा पाटील भिसे, रुपेश वडगावकर, बंडू बेद्रे , प्रा.आनंद पारडकर, कैलास साळुंखे, मोतीराम आमले, नंदू तोष्णीवाल , माधव वाघडव, सुधाकर पाईकराव, छप्पन पाईकराव, शिवा गायकवाड, गुणानंद पतंगे, नामदेव लाखाडे, मारोतराव खांद्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .