News Express24

site logo
Breaking News

अनिल कपूरने दिलं महागडं गिफ्ट, अनुपम खेर म्हणाले, बकवास मत करो!

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

 

3 डिसेंबर, 2021: बॉलिवु़डमध्ये आपल्या कॉमेडी आणि हलक्याफुलक्या भुमिकांसह गंभीर अदाकारीसाठीही अनुपम खेर ओळखले जातात. सातत्याने नवनवीन भूमिकांचे आव्हान पेलताना ते सोशल मीडियावरही सक्रीय असतात. अनुपम खेर यांनी केलेले एक गंमतीशीर ‘कू’ सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

झाले असे, की सदाबहार अभिनेता अनिल कपूर खेर यांना भेटायला गेला. त्याने जाताना गिफ्ट म्हणून खेर यांच्यासाठी एक चष्मा नेला. तो पाहून खेर एकदमच भारावून गेले. त्यांनी लगोलग तो डोळ्यांवर चढवला. पाहून अनिल कपूरने प्रतिक्रिया दिली, “इतका महागडा चष्मा शोभत नाहीय तुम्हाला… कुणाचा मागून घातलाय असं वाटतं आहे.” यावर खेर एकदम रागावत बोलले, “क्या बकवास कर रहे हो?” या संवादाचा व्हीडिओ खेर यांनी ‘कू’वर पोस्ट केला असून लोक त्यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत.

खेर यांनी व्हीडिओ पोस्ट करताना मिश्कील टिप्पणीही केली आहे. ते म्हणतात, ‘माझा दोस्त अनिल कपूरने खास माझ्यासाठी लंडनहून डिझायनर चष्मा आणलाय. गिफ्टचा बॉक्स बघुनच मी नर्वस झालोय. अनिलनं दोनदा सांगितलं की चष्मा किती महागडा आहे, तरी मी वाईट वाटून घेतलं नाही. त्यांचं हे औदार्य चांगल्या दोस्तीचं चांगलं उदाहरण आहे. देव करो, असे दोस्त सगळ्यांना मिळो! धन्यवाद अनिलजी!’ व्हीडिओत अनिलने दिलेला चष्मा उतरवत पुन्हा आपला चष्मा घालताना खेर म्हणतात, “ये मेरा गरीब चष्मा, और ये रहा गिफ्ट मिला हुआ अनिल चष्मा!

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist