अंधश्रद्धेतून 4 जणांची बेदम मारहाण करून हत्या

21/07/2019

२१ जुलै : गुमला : झारखंड : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून 4 जणांना बेदम मारहाण करून त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील सिसकारी गावात शनिवारी ही घटना घडली. 10 ते 12 लोकांनी चार लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण […]

Read More

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या खेळाडूंना संधी

21/07/2019

२१ जुलै : नवी दिल्ली : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीच्या आजच्या बैठकीनंतर एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी ही घोषणा करण्यात आली. या दौऱ्यामध्ये भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहे. काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर काही आधीच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. भारतीय […]

Read More

धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम

21/07/2019

२१ जुलै : नवी दिल्ली : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- भारताची धावपटू हिमा दासनं (Athlet Hima Das) शनिवारी (20 जुलै) आणखी एक सुवर्णपदकं (Gold Medal) पटकावलं. तिनं चेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत पहिलं स्थान मिळवलं. हिमानं 52.09 सेकंदांमध्ये हे अंतर पूर्ण केलं. तिनं ट्विट करत याची माहिती दिली. हिमानं […]

Read More

मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

21/07/2019

२१ जुलै : मुंबई : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- रेल्वेच्या विविध कामांनिमित्त  २१ जुलै रोजी अर्थात रविवारी मध्य रेल्वे मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाइंदर दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बवरील लोकल रद्द राहतील. तर अन्य मार्गावरील लोकल पंधरा […]

Read More

केरळला मुसळधार पावसाचा तडाखा; दोघांचा मृत्यू, चार मच्छीमार बेपत्ता

21/07/2019

२१ जुलै : नवी दिल्ली : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत दोनजण ठार झाले असून, तमिळनाडूतील ३ मच्छिमारांसह चार मच्छिमार बेपत्ता आहेत. कासरगोड जिल्ह्य़ातील कुडुले येथे शनिवापर्यंत ३० सेंटीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. इडुकी या पर्वतीय जिल्ह्य़ातील कोन्नाथडी खेडय़ात शनिवारी सकाळी किरकोळ भूस्खलन झाल्याने पिकांचे नुकसान झाले, मात्र यात […]

Read More

खाजगी शिक्षकांचे जि.प.त समायोजन नको – शिक्षक सेना

21/07/2019

२१ जुलै : नांदेड : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या व मनपाच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात आले आहे. तसेच त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करण्यात येणार असल्याच्या हालचाली आहेत. जि. प. च्या शाळांमध्ये अनेक शिक्षक विविध कारणांनी अतिरिक्त ठरले असून खाजगी शिक्षकांऐवजी त्यांचे समायोजन करावे अन्यथा तीव्र आंदोलन […]

Read More

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

20/07/2019

२० जुलै : नवी दिल्ली : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचं निधन झालं. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे […]

Read More

विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात- एकनाथ शिंदे

20/07/2019

२० जुलै : मुंबई : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपाची वाट धरत असताना विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेनी केला आहे. भविष्यात अनेक जण शिवसेनेत येतील, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षातील किती आणि कोणते आमदार शिवसेनेत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली […]

Read More

कात्रज- कोंढवा रस्त्यावर जलवाहिनी फुटली

20/07/2019

२० जुलै : पुणे : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारण्यात आली होती. त्यानंतर आता कुठे जरा पाऊस होतो न होतो तोच पुन्हा पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसू लागला आहे. कात्रज – कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना मोठी जलवाहिनी साडेदहाच्या सुमारास फुटली. या वाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया गेले.  कात्रज – […]

Read More

‘स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी अ‍ॅपवर सूचना पाठवा’, मोदींचे जनतेला आवाहन

20/07/2019

२० जुलै : नवी दिल्ली : न्यूज एक्सप्रेस २४ नेटवर्क :- स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण करणार असलेल्या भाषणात कोणकोणते मुद्दे असावेत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. लोकांनी आपल्या मनात असलेल्या संकल्पना, विचार नमो अ‍ॅपमधील ओपन फोरमवर कळवावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून भाषण करतात. त्या […]

Read More
Translate »